सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव : येथील राष्ट्रीय विद्यालय समोर चारचाकी वाहणाने एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १ वाजेच्या दरम्यान,घडली.
मृतक पारितोष संजय गाताडे (26) रा. सराटी असे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पारितोष हा सकाळी बांधकामच्या कामासाठी मजूर घेऊन शहरात पोहचला अशातच परिचित नातेवाईक यांची दुचाकी (विना नंबर असलेली सुझूकी) घेऊन कामानिमित्त निघाला असता (मृतक पारितोष संजय गाताडे रा. सराटी)
शहरातील राष्ट्रीय विद्यालय महाविद्यालय समोर आपली दुचाकी टर्न मारत असताना वणीकडून येणारी कृजर (सीटर) क्रं. एम एच 31 बी बी 6457 या नंबर च्या वाहनाने विना नंबर च्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात पारितोष जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. अधिक मारेगाव पोलीस करीत आहे.