सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : फॅमिली पेंशन, ग्रॅज्युईटी आणि जुणी पेंशन योजना या प्रमुख मागण्यांसाठी आज सोमवार दि.६ डिसेंबरला दुपारी शहरातील चंद्रपूर-नागपूर या मुख्य मार्गावर असलेल्या न्यू इंग्लिश हायस्कुलच्या मैदानावर पेंशन संघर्ष यात्रा पाेहचली.
चंद्रपूर जिल्हा जुनी पेंशन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आज एका सभेचे आयोजन करण्यात आले हाेते. यात अनेक पदाधिका-यांनी सभेला संबाेधित केले. दरम्यान दि.२२ नाेव्हेंबर राेजी पेंशन संघर्ष यात्रेचा प्रारंभ मुंबई आझाद मैदान वरुन झाला. ती संघर्ष यात्रा आज साेमवारला चंद्रपूरात सकाळी पाेहचली.
या वेळी अनेक कर्मचारी बांधवानी या पेंशन संघर्ष यात्रेचे स्वागत केले. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारों कर्मचारी बांधव आजच्या सभेला उपस्थित झाले हाेते. दुपारी ४ वाजता एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना मागण्यांचे एक लेखी निवेदन सादर केले. या कर्मचा-यांच्या मागण्या रास्त असून त्याकडे शासनाने लक्ष पुरवून त्याची परीपुर्तता करायला हवी अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया सर्व स्तरावरुन उमटल्या हाेत्या.
पार पडलेल्या सभेला राज्य सरकारी,निम शासकीय मध्यवर्ती कर्मचारी संघटना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, खाजगी प्राथमिक शिक्षक संघ व अन्य संघटनाचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित हाेते. न्यू इंग्लिश हायस्कुलचे प्रांगण अक्षरश: कर्मचा-यांच्या उपस्थितीने फुलून गेले हाेते.