सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (७ ऑक्टो.) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रत्येक राज्यातील एका शिक्षकास एमव्हीएलए ट्रस्ट कडुन त्याच्या उल्लेखनीय व विशेष कामगिरी बाबत पुरस्कार दिला जाताे .महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं काव्यकुंजच्या जेष्ठ सदस्या व चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आक्सापूर शाळेच्या शिक्षिका सुशीला पुरेड्डीवार यांची उपरोक्त ट्रस्ट कडुन या पुरस्कारसाठी महाराष्ट्रातुन एकमेव निवड झाली. दरम्यान ५ ऑक्टाेबरला हैदराबाद येथील हम्सपायर् प्लाझा या हॉटेल मध्ये झालेल्या एका शानदार कार्यक्रमात Global Teacher Role Model हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना पद्मश्री विजयकुमार शाह व विजयालक्ष्मी राव यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील बहु आयामी व्यक्तीमत्व असलेल्या सुशीला पुरेड्डीवार यांना तीन दिवसांपूर्वीच
उपराजधानी नागपूरात पार पडलेल्या एका नेत्रदिपक कार्यक्रमात (विदर्भस्तरीय) लाेकमत एक्सलेंट अवार्ड पुरस्कार प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे आज पावेताे त्यांना त्यांचे उल्लेखनीय कामगिरी साठी अनेक पुरस्कार मिळाले आहे. शैक्षणिक क्षेत्रासाेबतच त्यांना साहित्य क्षेत्रात विशेष रुची व गाेडी आहे. त्यांचे बरेच साहित्य वर्तमान पत्रातुन प्रकाशित झाले आहे. सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान आज पावेताे माेलाचे ठरले आहे.
सुशीला पुरेड्डीवार यांना उपरोक्त राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बद्दल नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठच्या मुख्य मार्गदर्शिका मेघा धाेटे, मायाताई काेसरे, प्रभा अगडे, सिमा पाटील, सहजं सुचलं ग्रुपच्या संयाेजिका सुविद्या बांबाेडे, सराेज हिवरे, उज्वला यामावार, सारीका खाेब्रागडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सह्याद्री न्यूज नेटवर्कने सामाजिक कार्यात नेहमीच आपल्याला प्रोत्साहन दिल्याची भावना (राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त) सुशीला पुरेड्डीवार यांनी आपल्या बाेलण्यांतुन आज व्यक्त केली.