Page

यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, खर्चा एवढे उत्पादन निघणे झाले कठीण

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव, (७ ऑक्टो.) : मारेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून गेल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी अंधारातच होणार की काय अशी शंका शेतकऱ्यांच्या मनाला लागली आहे.
मारेगाव तालुक्यातील नदी काठची पिके तर पूर्णता  पाण्यात न्हाहून गेली आहेत. शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे फटका इतका मोठ्या प्रमाणात बसला की, उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. संततधार पावसाने सोयाबीनचे पीक हातातून निघून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाची आशा होती
मात्र, संततधार पावसाने कापसाचे बोंड मोठ्या प्रमाणात पडझड होत असल्यामुळे खर्च एवढे उत्पादन निघाले तर नशीबच वाटत आहेत
उभ्या सोयाबीन झाडाला कोंब कुठे आहेत तर, कुठे सोयाबीन पावसाने काळी पडल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी आठ, नऊ चा उतार येत होता त्या ठिकाणी मात्र, तीन चार कुंटल
वर समाधान व्यक्त करावे लागत आहे.
केंद्र शासनाने बारा हजार रुपये कुंटलचे सोयाबीनचे भाव पाच हजार रुपयांवर आणून ठेवल्यामूळे तर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करीत आहेत. 
राज्य शासनाकडून पंचनामा करण्याचे तोंडी आदेश मिळत आहे मात्र, प्रत्यक्षात बांधावर महसुल कृषी पंचायत विभागातील अधिकारी दिसत नाही.
या परिस्थितीचा विचार करत सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देणे गरजेचे आहे.
मात्र, 'मनात नाही नांदन, अन्न पोवळे बांधणं' अशी भूमिका शासन घेत आहे.
अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांना या वर्षी अंधारातच दिवाळी करण्याची पाळी येणार आहे.