Page

जेसीआय रॉयल्सच्या वतीने शिक्षक दिन हाेणार साजरा, आदर्श शिक्षक पुरस्काराने मेघाताई धाेटे हाेणार सन्मानित !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (०४ सप्टें.) : राजूरा जेसीआय रॉयल्सच्या वतीने उद्या रविवार दि.५ सप्टेंबरला शिक्षण दिन थाटात साजरा करण्यात येणार आहे. सदरहु कार्यक्रमाचे आयोजन पी.डब्लू डी. हॉल बल्लारपुर येथे करण्यात आले असून, अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या राजूरा, काेरपना व जिवती येथील काही शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीत स्थानिक राजूरा येथील इनफेंट जीजस् इंग्लिश पालिक हाईस्कुल राजुराच्या शिक्षिका अधिवक्ता मेघा धाेटे यांची निवड झाल्याचे समजते.

उपरोक्त आयाेजित कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रेसीडेंट झोनल ऑफिसर सुषमा शुक्ला व जेसीआयच्या सेक्रेटरी जयश्री शेंडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. राजुऱ्याच्या अधिवक्ता मेघा धाेटे या महाराष्ट्रातील नामवंत "सहज सुचलं" महिला व्यासपीठाच्या मार्गदर्शिका आहे.