Page

मांजरवघळ येथे माती परीक्षण उपक्रम


सह्याद्री न्यूज | रुस्तम शेख 
यवतमाळ, (०३ ऑगस्ट) : यवतमाळ येथील मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाच्या, विद्यार्थी रुपेश सुनीलराव मालकापुरे याने तालुक्यातील मौजा मांजरवघळ येथील प्रयोगशील शेतकरी हरिभाऊ लहरुजी भागवत यांच्या शेतात माती परीक्षण राबविला.
         
माती परीक्षण का केली पाहिजे, माती परिक्षणामुळे शेतीला लागणार अनाठायी खर्च कसा थांबवता येईल, अर्थात पिकाच्या गरजेनुसार त्यांना रासायनिक खते व कश्याप्रकारे जमिनीचा पोच सुधारता येईल व कोणत्या जमिनीत कोणते पीक घेणे योग्य राहील या सर्व बाबीवर निर्णय घेणे सोपे होते.

या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. आर .ए. ठाकरे ,उपप्रचार्य एम.व्ही.कडू श्री.शुभम सरप व श्री. मिस प्रणिता चावरे यांन सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.