Page

केशरी शिधा पत्रिकाधारकांना धान्य पुरवठा करा -चंद्रपूरच्या यंग चांदा ब्रिगेडची मागणी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२६ ऑगस्ट) : सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणांऱ्या व सर्व सामान्य जनतेचे महत्वाचे प्रश्न साेडविणांऱ्या चंद्रपूरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केशरी शिधापत्रिका धारकांना नियमित धान्य पुरवठा करण्यांत यावा अश्या आशयाच्या मागणीचे एक निवेदन जिल्हा प्रशासनला काल (बुधवारी) सादर करण्यात आले. तदवंच या मागणीचे एक निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे मार्फत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना पाठविण्यांत आले आहे. अनेक गरीब कष्टकरी मजूर, कामगार वर्गांकडे शासनाचे केशरी कार्ड उपलब्ध आहे. परंतु त्यांना शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातुन धान्य पुरवठा केला जात नाही. प्रत्येकाच्या उत्पन्न  गटानुसार शिधापत्रिका तयार करण्यात आल्या आहे. त्यानुसार पिवळे,पांढरे व केशरी रंगाचे रेशन कार्ड तयार झाले. परंतु फक्त पिवळ्या रंगाच्या शिधापत्रिका धारकांना धान्य पुरवठा केल्या जात आहे.

आज अनेक गरीब कुटुंब या धान्य पुरवठा पासून वंचित असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करतांना यंग चांदा ब्रिगेड आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, सिध्दार्थ मेश्राम, रुपेश मुलकावार, नितेश बाेरकुटे, शिवप्रसाद रहागंडाले, नरेश आत्राम, वसिम कुरेशी व संघटनेचे अन्य सदस्यगण उपस्थित हाेते.