सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
चंद्रपूर, (४ जुलै) : आणखी एक नव्हाने मोठा सरकारी जमीनिचा भहाघोटाळा उघडकीस तत्कालीन S D M अजीत पवार नंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.प्रदीप काळभोर यांनीही केला महाघोटाळा.
दिनांक 2/7/2021 चा माहीतीचा अधिकारात माहिती उघड.
तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर वरही फौजदारी कारवाई करण्याची मागणी. जागृत नागरिक,व जबाबदार एकमेव तलाठी विनोद खोब्रागडे महसूल विभाग चंद्रपूर यांनीच केली आहे.
सविस्तर असे की, चंद्रपूर शहरातील,महानगरपालिका हद्दीतील,दे .गो.रै.येथील स.न. 107/1ख हे.आर.2.32 इतकी जागा मधुकर खांडरे यांचा नावाने 1978 पासून होती,
त्यांच्या मुत्यु नंतर मुलगा किशोर खांडरे व इतर यांनी सन 2000 मध्ये व सन 2001 मध्ये श्री. नंदलाल बियानी यांना 2.32 हे. आर. पैकी 1.20 हे.आर.जमीन विकली, असता शिल्लक 1.12 हे.आर.राहते.
असे असताना तत्कालीन S D M अजीत पवार यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून डायरेक्ट स.न.107/1ख मध्ये, 1-12 हे.आर.ऐवजी 3.50 हे.आर.जमीन वाढ करून आदेश दिले.
मात्र, ती जमीन कुठून घट वाढ केली, याचा तपशील नाही, के.जी.पी. केले नाही,अधिक्षक भुमी अभिलेख चा अहवाल नाही, याचा आदेशात कुठेही उल्लेख तत्कालीन S D M अजीत पवार यांनी जाणूनबुजून केला नाही. व बोगस आदेश दिले.
नंतर तत्कालीन तलाठी यांनी बोगस 7/12 तयार करून किशोर खांडरे व इतर यांना दिले,नंतर किशोर खांडरे व इतर यांनी ती जमीन नियमबाह्य व बेकायदेशीर, डालीया व इतरांना विकली.
तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री प्रदीप काळभोर यांनी तर हद्दच केली, स.न.107/1ख मध्ये सौ.अहिल्याबाई लक्ष्मीनारायण डालीया,यांचा नावाने नियमबाह्य व बेकायदेशीर 1-54 हे.आर 7/12 मध्ये नोंद असताना, डायरेक्ट 1-80 हे.आर चे अकुषक आदेश जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी केलेच कसे.? मुळात ती जमीनच बेकायदेशीर डालीया यांना बनावट 7/12 तयार करून विकली होती.याची शाहानिशा का केली नाही.
तसेच प्रदीप खांडरे यांचेही नाव त्या स.न. 107/1ख मध्ये 0-30 हे.आर.कायदेशीर नसतानाही त्याच दिवशी अकुषक चा आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.प्रदीप काळभोर यांनी केलाच कसा.?
कोणत्याही जमीनीचे अकुषक/परावर्तित करतांना त्यांचा मुळ 7/12,
तपासल्या जातो,अधिकार अभिलेख पंजी ,तपासल्या जातो,अनेक विभागाकडून परवानगी मागीत्या जाते,आणि खात्री झाल्यानंतरच अकुषकचा आदेश दिल्या जाते.मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून असे बेकायदेशीर आदेश एक जबाबदार जिल्हाधिकारी कसा काय करू शकतो.?
अशाप्रकारे तत्कालीन
SDM अजीत पवार,व तत्कालीन DM श्री.प्रदीप काळभोर यांनी मिळून चंद्रपूर शहरातील,व महानगरपालिका हद्दीतील,व चंद्रपूर जिल्ह्यातील किती सरकारी जमीनीची विल्हेवाट लावली असेल,याची चौकशी केंद्र सरकारने CBI, व
ED,मार्फत करावी,
विशेष म्हणजे या पुर्वी सुद्धा हाच भ्रष्टाचारी अधिकारी अजीत पवार यांनी,नियमबाह्य व बेकायदेशीर प्रदीप खांडरे व इतर यांना सरकारी जमीन बिना अर्जाने अकुषक करून दिली आहे.
अश्या भ्रष्टाचारी अधिकारी यांना एक मिनिट सुद्धा अशा महत्त्वाचा पदावर ठेवण्याचा लायकीचे नाही,म्हणून, तात्काळ त्यांना सेवेतून भारतीय संविधानातील अनुच्छेद 311 नुसार बडतर्फ करावे,व त्यांची अवैध मालमत्ता जप्त करावी. त्यांचे पेन्शन बंद करावे.
महाराष्ट्र शासन हे काम करुच शकत नाही,त्यांचात हिम्मत नाही म्हणून केंद्र सरकारने विशेष लक्ष द्यावे,
अन्यथा मला भारत सरकारवरही एक्शन घ्यावी लागेल. याची नोंद घ्यावी.
एक लक्षात घ्या,आपल्या देशात कायद्याच्ये राज्य आहे,मनमानीचे नाही, कुणी कितीही मोठा अधिकारी असो, P M,C M,D M असो,कायद्यापुढे सर्व समान आहेत. जनहीतार्थ जारी आपला जागृत नागरिक जबाबदार तलाठी, विनोद खोब्रागडे महसूल विभाग चंद्रपूर. यानी एका पत्रकाद्वारे वि,विर या सा.यांनी माहिती दिली आहे .