सह्याद्री न्यूज नेटवर्क |
पुसद, (१५ जुलै) : वसंत नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या खंडाळा घाटातील येलदरी जवळ ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर चालकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
प्राप्त माहिती नुसार दि.१४ जुलै २०२१ रोजी दिवसभर सकाळपासून पुसद तालुक्यामध्ये पाऊसाची संततधार सुरु असल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी सुरू होते.
यावेळी खंडाळा घाटातील येलदरी जवळ चालक सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर चालवत घेऊन येत असताना अचानक घाटातील वळणावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने निंबी येथील रहिवासी असलेला ट्रॅक्टर चालक राहुल शेजुळे हा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सदर घटनेची माहिती वसंतनगर पोलीस स्टेशनला कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून चालकास उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.