Page

जमिनीवर राहूनच स्वकृतीतुन समाजाला न्याय देत यशाचे शिखर गाठणारे विश्वासू नेतृत्व देवरावजी सोनटक्के (साहेब)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
कोण यशाचं मंदिर गाठून समाजाला न्याय मिळवून देणार या प्रतिक्षेत राज्यातील समाजबांधव गेल्या सत्तर वर्षांपासून प्रतिक्षेत असताना नेतृत्व मिळालं ते देवरावजी सोनटक्के साहेब यांच्या रूपात. "म्हणतात ना देव बरोबर करते" साक्षात समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मा. श्री.देवरावजी सोनटक्के साहेब यांनी भूमातेला वंदन करून सर्वप्रथम स्वताच्या कर्तृत्वार विश्वास संपादन केला. जमिनीवरच राहून विजय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक कार्यकर्त्याची फौज तयार करणारे सोनटक्के साहेब आज राज्यात विजयश्री म्हणून अव्वल ठरले आहेत.
प्रत्येक चळवळीला एका सूत्राची मात्रा आवश्यक असते. यासाठी असावे लागते मजबूत संघटन जर का हे संघटन मजबूत नसेल तर चळवळ दिशाहीन व तर्कहीन होते असं झालं तर तिची खिल्ली उडवली जाते ती खिल्ली उडवू नये, म्हणून साहेबांनी कार्यकर्त्याची पावरबाज टीम तयार केली.

समाजाच्या नावावर आजही अनेक संघटना पोटपाणी चालवण्यासाठीचा प्रपंच करण्याकरिता उभारलेल्या असून समाजाला अंधारात ठेवण्याचं काम करतात अशा संघटनेच्या माध्यमातून खोट्या विचाराची बीजे संदेह जनतेमध्ये रुजावीत हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. हा धोकादायक असलेला उद्देश सोनटक्के साहेबांनी हद्दपार करून टाकला आणि समाजाला यशाच्या शिखरावर पोहचविले,
कधीकधी पावसाळ्यातील छत्री आळंबी सारख्या कडवट उगवलेल्या संघटना समाजाचा समग्र गळा दाबणे साठीच निर्माण केल्या जातात. व जन्माला घातले जातात. तर समाजाचा घात होऊ नये,म्हणून महासघातील सर्वभाषिक टीम मदतीस पात्र ठरीत आहे. याला कारणच सोनटक्के साहेब याचं कर्तृत्व आणि मार्गदर्शन कारणीभूत ठरत आहे.
(भैय्याजी रोहणकर,जेष्ठ मार्गदर्शक तथा प्रदेश उपाध्यक्ष )  

समाज संघटन तर केलं पण समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्यायचं शासकीय व्यवस्थेने कुलुपा मध्ये अडकून ठेवलेला आहे आणि तो मिळवून देण्यासाठी योग्य त्या किल्लीची गरज आहे. आतापर्यंत निर्माण झालेल्या संघटनांनी चाळीस वर्षे किल्लीचा शोधच घेतला नाही तर यश कसं मिळेल. परंतु सोनटक्के साहेबाची जिद्दी "माझा समाज देशातील इतर नागरिकप्रमाणे सुखाने, समाधानाने व सन्मानाने जगला पाहिजे" हाच हक्क मिळवून देण्यासाठी साहेबांनी तयार केलेल्या सर्वभाषिक फौजेला सोबत घेऊन गेल्या सत्तर वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या व दबलेल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी किल्लीचा शोध लावून लाँड्री वीज बिल,गाडगेबाबा शासकीय जयंती असे अनेक प्रश्न एका झटक्यात सोडविले. आरक्षणचा लढा अंतिम टप्प्यात पोहोचविला. अशा यशवंत किर्तीवंत साहेबांना मानाचा मुजरा.
            
-श्री. किशोर केळझरकर, वरोरा 
चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष धोबी समाज महासंघ सर्वभाषिक तथा सामाजिक
संपर्क : ८८४७७०९२०१