सह्याद्री न्यूज | राजविलास
यवतमाळ, (ता.२१) : मा. ना. महादेव जानकर साहेबांच्या विचारांचा वारसा जपत सत्यशोधन, समजप्रबोधन व राष्ट्रनिर्माण या मुलमंत्रासह कार्यरत होण्यासाठी विदर्भ अध्यक्ष चेतन भाऊ आगलावे यांच्या नेतृत्वात दिनांक २० जून २०२१ रोजी सांस्कृतिक भवन यवतमाळ येथे राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी मेळावा यशस्वीपणे संपन्न झाला. यवतमाळ शहर कार्यकारीणी सह अनेक पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या.
प्रामुख्याने अमोल डफाल यांची जिल्हा उपाध्यक्ष, नासीर खान उपजिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक, प्रशांत नखाते यांची शहर उपाध्यक्ष, जुबेर खान यांची शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक अंकुश मस्के यांची शहर अध्यक्ष युवा आघाडी, योगेश गुप्ता यांची जिल्हा सचिव पदावर, दर्शन गोफणे यांची तालुका उपाध्यक्ष घाटंजी, नयन राऊत यांची तालुका अध्यक्ष घाटंजी पदावर नियुक्ती करण्यात आली. या सह अनेकांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला.
यवतमाळ सह प्रत्येक तालुक्यात, अनेक विभागात तसेच विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकारी मेळावे घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष मजबुती ने उभा करण्याचा विश्वास अध्यक्षीय भाषणात चेतनभाऊ आगलावे यांनी व्यक्त केला.
सर्व नियुक्त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.