टॉप बातम्या

भाजपा नेते विजयबाबू चोरडिया यांच्यावर अभिष्टचिंतनाचा वर्षाव; शहरभर समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वाढदिवस म्हणजे केवळ एक दिवस साजरा करणे नव्हे, तर आयुष्यभरासाठी आनंद, प्रेम आणि अविस्मरणीय आठवणी निर्माण करणे होय. असाच अविस्मरणीय अभिष्टचिंतन सोहळा गुरुवार दि. 4 सप्टेंबर ला वणी येथील दानशूर व्यक्तिमत्व तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार,माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, प्रदीप जेऊरकर (ता अध्यक्ष), अ‍ॅड निलेश चौधरी (शहराध्यक्ष), राजाभाऊ पाथ्रडकर, राजाभाऊ बिलोरिया, मोहन हरडे, सौ निलिमा काळे, मंगेश देशपांडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. 

या प्रसंगी राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही विजयबाबुंना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं की, "तुमच्या जीवनातील आजच्या या विशेष दिनानिमित्त माझ्या आपल्याला अनेकानेक शुभेच्छा !
वाढदिवस हा जसा साजरा करण्याचा दिवस तसाच मागच्या कालखंडाचे सिंहावलोकन करुन नवीन संकल्प करण्याचाही दिवस. तुमचे सर्व संकल्प फळाला येवोत. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे अशा सदिच्छा आजच्या या दिवसानिमित्त मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा"

वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय रामचंद्र खाडे, यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेते,पदाधिकारी, परिसरातील उद्योजक, पत्रकार तसेच शिक्षण, सहकार, सामाजिक कार्यकर्ते आदींनी प्रत्यक्ष सोहळ्यात उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यानंतरही समाजमाध्यमांवरून विजयबाबू चोरडिया यांच्यावर शुभेच्छा देण्याचा ओघ सुरुच होता.

कार्यकरिणी सदस्य श्री. चोरडिया यांनी छोरिया येथील विनायक मंगल, कार्यालयात शुभेच्छा स्वीकारल्या. कार्क्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप अलोणे यांनी केले तर आभारप्रदर्शन अ‍ॅड कुणाल चोरडिया यांनी मानले.
Previous Post Next Post