सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद यात्रा सुरू केली असून वणी झरी मारेगांव तालुक्यात त्यांचा झंझावाती दौरा संपन्न झाला.
या दौऱ्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर सभा झाल्या असून बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेतला. डॉ.नीरज वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्रस्थापित आणि मनुवादी पक्षाने बहुजन चळवळीचे अनेक तुकडे केले असून फुले शाहू आंबेडकरी शक्तीचे खच्चीकरण केले आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये केवळ बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हाच पक्ष वंचितांचा सत्तेकडे नेणारा मार्ग प्रशस्त करू शकतो. आणि म्हणून बेचाळीस लाख मतदानाचा टप्पा पार करणारा फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतला हा एकमेव पक्ष असून बाळासाहेबांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, जेणेकरून वंचितांना सत्तेत भागीदारी मिळेल. डॉ.नीरज वाघमारे यांच्या संबोधनाने प्रभावित होऊन अनेक लोकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. वणी झरी मारेगांव तालुक्यातील संपूर्ण दिवसभर झालेल्या भरगच्च सभांमधून जनतेने अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून डॉ.नीरज वाघमारे यांनी वणी व मारेगाव विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. या
संवाद दौऱ्यात गावागावातील शेकडो नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेवर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला.
या संवाद दौऱ्यात खालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग घेऊन वणी झरी आणि मारेगांव तालुक्यात दौरा यशस्वी केला. यामध्ये मिलिंद पाटील-जिल्हा महासचिव, राजेंद्र निमसटकर, गौतम दारुंडे-तालुकाध्यक्ष मारेगाव, गजानन चंदनखेडे, संजय जीवने -तालुका उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर मून, दिलीप पाटील, अनंत खाडे, वासूमित्र वनकर, गोरखनाथ पाटील, अभीषा निमसटकर, निळावती मून, लताबाई वनकर, बालू गजभिये, विजय खाडे, ज्ञानेश्वर धोपटे, गौतम ताकसांडे, धीरज लोखंडे, लीलाधर कोरझरे, राजू पाटील, बंटी बाभळे, अमर खैरे, कैलास खाडे, बाळू टेणपे, रामा पिपराडे, राजकुमार राऊत, शेख सलीम शेख रऊफ, प्रणिता काळे, नंदिनी ठमके.
तसेच झरी तालुक्यातील राजीव कांबळे, प्रियल पथाडे, गौतम हस्ते, राजबा धोटे, महादेव धोटे, गगन ड्यागर्लावार अशोक बट्टावार, अनुप भांदककर, शरद पळवेकर, सुखदेव वाघमारे, नवनाथ देवतळे, भूषण काटकर, गंगाधर बनकर, राजीव करमणकर, निकेश कांबळे, राजू धोटे, गौतम मून, उत्तम मून,गौतम बाराहाते, सुधाकर नरांजे, हेमराज नगराळे, अमर रामटेके, ओमप्रकाश तेलंग, इत्यादी मंडळी सह परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.