सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त जय श्री कृष्ण जन्माष्टमी समिती च्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन १३ ते १७ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले होते.
दिनांक १६ ऑगस्ट ला श्रीकृष्ण भवन येथील श्री कृष्ण मंदिरात दुपारी तीन वाजता भगवान श्रीकृष्णाची पूजा,आरती पार पडली. या भक्तिमय वातावरणात एक हात मदतीचा म्हणून जय श्री कृष्ण जन्माष्टमी महिला समिती तर्फे शहरालगत असलेल्या लालगुडा येथिल एका दिव्यांग व्यक्तीला सायकल भेट देण्यात आली.