सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मनोरंजन क्लब ही अशी जागा आहे जिथे लोक विविध प्रकारच्या मनोरंजक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात, जसे की खेळ, सामाजिक कार्यक्रम आणि फिटनेस वर्ग. यामुळे सहभागी सदस्यांसाठी आनंददायक आणि आकर्षक क्रियाकलापांद्वारे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
परंतु आजची परिस्थिती तालुक्यात जरा वेगळी आहे,असं बोलल्या जाते. विशेष म्हणजे मनोरंजनात्मक क्लब मधून एकत्र येण्याची आणि विविध मनोरंजक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी याला बघल देत या ठिकाणी काही औरंच प्रकार असल्याने विनाशकाले विपरीत बुद्धी. विशिष्ट टोकन देऊन सरळ सरळ "जोकर" हाच प्रकार आता या क्लब च्या माध्यमातून फोफावलाय. या ठिकाणी प्रत्यक्षात व्यवहार जरी नसले तरी अपहार कुठे ना कुठे होतोय, त्याशिवाय या मनोरंजन क्लब ला अर्थ तरी काय?असा प्रश्न देखील आहेतच.
क्लबचे उद्दिष्ट सदस्यांच्या जीवनात आनंद आणि आनंद आणणे तसेच त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारणे हा विषयच आता बेपत्ता झाला असून फक्त खेळ पत्ता...असाच काहीसा प्रकाश रात्री पाळीत सुरु असल्याची नागरिकात चर्चा आहे. कुणाचा आशीर्वाद असो की नसो,वेळ अजूनही गेलेली नाही. जर अशा मनोरंजन क्लब मधून जुगार किंवा कायद्याचे उलंघन होणारे, सामाजिक स्वास्थ बिघडवणारे प्रकार फोफावत असतील तर याचा वेळीच बंदोबस्त व्हायला हवा. यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलून लाखों जण या जाळ्यात अडकलेल्यांना सुटकेचा निःश्वास द्यावा,असे सुजाण नागरिकांतून सावकाश बोलल्या जात आहे.