Top News

विद्यार्थी गुणगौरव सोहळा वणी येथे संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल चव्हाण यांचे दि. 5 जुलै रोजी श्री विनायक मंगल कार्यालयात भव्य स्वागत व सत्कार करण्यात आले. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल चव्हाण यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना प्रगती करायची असेल तर सोशल मीडिया आणि मोबाईल पासून दूर राहावे जर मोबाईलचा योग्य वापर झाला नाही तर, त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. ज्या विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात रुची आहे तेच क्षेत्र शिक्षणासाठी निवडावे यासाठी समोरचा दृष्टिकोन लक्षात घ्यावा, अपयशाला खचून जाऊ नये असेही ते म्हणाले. 
यावेळी मंचावर भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया, माजी नगराध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपाचे अमोल ढोणे, संघटन सरचिटणीस राजू पडगीलवार, माजी जि. प. सदस्य बंडू चांदेकर, अ‍ॅड.कुणाल चोरडिया, पवन एकरे, माजी नगरसेविका संध्या अवताडे, प्रीती बिडकर, स्वाती खरवडे, राहुल मुंजेकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.  

यावेळी त्यांनी आयोजकांचं भरभरून कौतुक केले,तुम्ही अशीच जनतेची सेवा करा, मी आणि भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काहीही अडचण जाणार नाही, असे अ‍ॅड.प्रफुल चव्हाण यांनी आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात म्हणाले. 

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अ‍ॅड.कुणाल चोरडिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, कोणत्याही विद्यार्थ्यांना माझी गरज पडल्यास मी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी, जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले, तर माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्ड यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना परीक्षेमध्ये पास होणे आणि गुणवत्ता यादीत येण  हा तेवढाच फरक आहे, जेवढ मोठ अंतर शिक्षित बेरोजगार आणि सुशिक्षित बेरोजगार या दोन शब्दांमध्ये आहे सुशिक्षित हा बेरोजगार नसतो शिक्षित हा बेरोजगार असतो. या दोन शब्दांमध्ये अंतर समजून घेतले तरी आपण उज्वल भविष्य घडवू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले. तर भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया यांनी ज्या विद्यार्थ्यांनी उच्चांक गाठून भविष्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे अशा विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल चव्हाण यांचेही अभिनंदन केले. 
दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी सह पालकांचा सन्माचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. दिलीप अलोणे तर आभारप्रदर्शन सागर जाधव यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक हजेरी लावली होती.
Previous Post Next Post