Top News

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा भक्तीभावात संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाववैष्णव शिंपी सामाजिक बहुउद्देशीय संस्था वणी, मारेगाव, झरी तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा मोठया भक्तीभावात आणि उत्सहात मार्डी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात संपन्न झाला. 

या निमित्ताने विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. सोमवार 21 जुलैला रात्री 8 वाजता घटस्थापना व महिलांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न होऊन 22 जुलैला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच प्रसिद्ध किर्तनकार राजू महाराज ईरदंडे यांच्या जाहीर किर्तच कार्यक्रम घेण्यात आला.
 
यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल जुमळे कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक उदयपाल महाराज तर प्रमुख अतिथी म्हणून वैष्णव शिंपी सामाजिक बहुउद्देशीय संस्था वणीचे सचिव सुरेश किटे तसेच मार्डी येथील सरपंच रविराज चंदनखेडे, पोलीस पाटील डॉ.प्रशांत पाटील, अभय जुमळे, मोरेश्वर उज्वलकर, पांडुरंग तुरंगे, अनंता जुमळे, अतुल बोबडे, देवराव जुमळे,आदी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरेश्वर उज्वलकर यांनी तर प्रास्ताविक कुंतलेश्वर तुरविले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुरेश किटे, श्रीकांत बहादे, अशोक ढाले, सुधाकर ढाले, कुंतलेश्वर तुरविले, किशोर जुमळे, अरुण वाढई, मारोती देवगीरकर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमांस मारेगाव, वणी, झरी तालुक्यातील समाजबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
Previous Post Next Post