सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : उद्या ६ एप्रिल रोजी, प्रभू श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समिती तर्फे भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मारेगावमध्ये ही परंपरा कायम आहे. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त रामरथाचे आयोजन करून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
या शोभायात्रेमध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम यांची देखणी मूर्ती आणि हनुमान यांच्या मूर्ती विशेष आकर्षण ठरणार आहेत. तसेच, शहराला भजनांनी मंत्रमुग्ध करण्यासाठी रामरथ, रामपालखी, घोडे, विविध बँड पथके अशा विविध पालख्यांसह ही शोभायात्रा निघणार आहे. भजन मंडळीसह विविध ठिकाणांहून आलेली भजनी मंडळी आपली कला
सादर करणार आहेत. याशिवाय, रामरथ, रामपालखी, घोडे, विविध बँड पथके अशा विविध पालख्यांसह ही शोभायात्रा निघणार आहे. रविवारी संध्याकाळी ५ वाजता नगर पंचायत च्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिरात रामरथाचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात होईल. ही शोभायात्रा नगर पंचायत, मार्डी चौक, स्टेट बँक मार्ग, राष्ट्रीय विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बाळासाहेब चौक, मार्गे पुन्हा हनुमान मंदिर येथे पोहोचेल आणि महाआरतीने समारोप होईल, असे उत्सव समितीचे आयोजकांनी सांगितले.