Page

मारेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
            
मारेगाव : 14 एप्रिल 2025 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्य अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. 

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी सकाळपासून बौद्ध अनुयायी व विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीयांनी मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलीत करीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, समता सैनिक दल व शहरातील तमाम मान्यवर, आंबेडकर अनुयायांनी वंदन करीत पोलीस निरीक्षक संजय सोळंखे यांचे हस्ते निळ्या ध्वजाचे धजारोहन करण्यात आले. यावेळी सामूहिक बुद्ध वंदनेने बाबासाहेबांना नमन करण्यात आले.

दुपारी विविध उपक्रम राबविण्यात आले. सायंकाळी ऐतिहासिक मिरवणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत शेकडो युवक, युवती, महिला व जेष्ठ नागरिकांनी फटाक्यांच्या रंगीबेरंगी आतिषबाजीचा धुराळा सह बँजो आणि डीजेच्या तालावर ठेका धरीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा जल्लोष साजरा करीत बाबासाहेबांना अभिवादन व बुद्धवंदनेने सांगता करण्यात आली.