टॉप बातम्या

खुद तहसीलदारांनी केला हायवा व पोकलॅन्ड मशीन जप्त

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : अवैध वाळू उपसा करणार्‍यांना महसूल विभागाने दणका दिला आहे. वणी तालुक्यातील झोला येथे अवैध घाट निर्माण करून वाळूची ची तस्करी करणाऱ्याच्या तहसीलदारांनी जबरदस्त कामगिरी करत चार ते पाच ब्रास चा एक हायवा व पोकलॅन्ड मशीन ताब्यात घेतला आहे. 

अवैध वाळू उपसा धंद्याविरुध्द तहसीलदार निखिल धुळधर यांनी जोरदार कामगिरी सुरू केली आहे. आज रविवारी (ता. 6) पहाटे वणी तालुक्यातील झोला येथील वर्धा नदीत अवैध वाळू उपसा करत असताना एक हायवा व एक पोकलॅन्ड मशीन जप्त केला आहे.

तहसीलदार निखिल धूळधर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तलाठी अंकुश जाधव यांना घेऊन ही पहाटे 3 वाजता धाड टाकली. दरम्यान तस्करांची चांगलीच दणादण उडाली, साहेब दिसताहेत म्हणून घाटात अलीकडून पलीकडे जाण्यासाठी पळापळ सुरु झाली. वाळू तस्कर पळून जाण्यात यशस्वी जरी झाले तरी त्यांचे अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेले हायवा व पोकलॅन्ड मशीन मात्र दंडात्मक कारवाई करिता तहसील कार्यालयात जमा केले असून नेमके मालक कोण हे कारवाईनंतर समोर येईल.
Previous Post Next Post