सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथी व थोर समाज सुधारक राष्टसंत संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मोहदा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावात पहाटे 5 वा.ग्रामस्वच्छता मोहीम राबविण्यात आली.त्यानंतर पालखी सोहळा गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली.
दरम्यान, श्री गुरुदेव भजन मंडळ, महिला भजन मंडळ तसेच पदावली भजन मंडळानी सहभाग घेतला होता. पुण्यतिथी निमित्ताने गावातील पुरुष महिला बालक एकत्र होत पुढील कार्य सोहळ्यास सुरुवात झाली.
राष्ट्रसंतांना श्रद्धांजली वाहल्या नंतर 6 वा.सामुदायिक प्रार्थना झाली. दिवस भर विविध कार्यक्रम संपन्न झाल्यावर सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचा लाभ घेत या कार्यक्रमाची सांगता झाली, यावेळी परिसरातील श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, श्री दत्त गुरुदेव पदावली भजन मंडळ, जय हनुमान भजन मंडळ,व समस्त ग्रामवासी मोहदा उपस्थित होते.