सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील गाडेगाव येथील गावात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील रोख, अन्नधान्य, व दैनंदिन जीवनाशक्य वस्तूची मोठी नुकसान झाली आहे. मात्र, सुदैवाने कुटुंबातील जीवितहानी झाली नाही अशी माहिती आहे.
घरातील 14.2 किलोच्या इण्डेन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही धक्कादायक घटना आज सकाळी 9.30 वाजता दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, आग आटोक्यात आणण्यात आली. भारत झिब्लूजी दाते नुकसानग्रस्ताचे असे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे ते आज सकाळी सिलेंडर सुरु करायला गेले असता अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. घरातील सर्व धान्य जळून खाक झाले. कपडेलत्तेही संपूर्ण जळाले. भांडेही जळून गेले. तसेच घरामध्ये असलेला टीव्ही, फ्रिज फुटले. कुलर, फॅन हे सुद्धा जमीनदोस्त झाले. घराचे छप्परही पूर्णपणे गायब झाले असून दाते यांचे मोठे नुकसान झालेले आहे. संबंधित विभागाने घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा केला.
मात्र, या धक्कादायक घटनेने दाते परिवार उघड्यावर आले असून आर्थिक संकटात सुद्धा सापडले आहे.