टॉप बातम्या

पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस विभागाने दिली मानवंदना

सह्याद्री चौफेर । वृतसंस्था 

यवतमाळ : 1 सप्टेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये देशांमध्ये एकूण 216 जवानांनी आपले कर्तव्य बजावत असताना मातृभूमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिली,त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून आज पोलीस स्मृतिदिन पाळण्यात आला. 

यावेळी प्रमुख अतिथी असलेले जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी स्मृती दिनाचे महत्त्व विशद केले. आयोजित कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय हुड यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्मृतिदिनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले तर, जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी स्मृतिदिनाचे महत्त्व सांगून 216 जवानांनी मातृभूमीच्या रक्षणार्थ प्राण्यांची आहुती दिली त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून त्यांना विनम्र अभिवादन केले.

हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले आणि परेड ग्राउंड वर शोकपरेडची कारवाई करून तीन ब्लॅक राउंड फायर केले.
Previous Post Next Post