टॉप बातम्या

मांगरूळ येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मांगरूळ येथील एका युवकाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. 

इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या साहिल वामनराव डाखरे रा. मांगरूळ या 18 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून दोन महिन्यापूर्वी वृद्धापकाळाने आजोबा वारले तर,काका यांचेही मध्यंतरी निधन झाले असे समजते आणि आता साहिल याने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

परिणामी तालुक्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनेत वाढ होत असताना प्रशासनाकडून जनजागृती होणे गरजेचे झाले आहे. 
Previous Post Next Post