सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : वणी तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले.मात्र, अजूनही पाहिजे त्या सुविधा मिळत नाही, परिणामी जीव गमवावा लागतोय,अशा आशयचे निवेदन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने उपविभागीय अधिकारी वणी यांना देण्यात आले.
निवेदनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे :
१) वणी येथे ग्रामिण रुग्णालय अस्तित्वात असून वणी तालुक्यातील रुग्णांसाठी स्थानिक पातळीवर रक्त तपासणी केंद्र (Blood Test Center) सुरू करण्यात यावे. सध्या ग्रामिण रुग्णालयातील रक्ताचे नमुने पांढरकवडा येथील महालॅबमध्ये पाठविण्यात येत असल्यामुळे त्याचा रिपोर्ट विलंबाने प्राप्त होतो. त्यामूळे एखाद्या रुग्णाला गंभीर आजार असल्यास रक्त तपासणी अहवाल वेळेत प्राप्त न झाल्यामुळे संबंधित आजाराच्या उपचारा अभावी जीव गमवावा लागतो व असे अनेक प्रकार आजपर्यंत वणी तालुक्यात घडलेले आहे. करीता वणी तालुक्यातील रुग्णांसाठी स्थानिक पातळीवर रक्त तपासणी केंद्र (Blood Test Center) वणी तालुक्यातील रुग्णांसाठी स्थानिक पातळीवर रक्त तपासणी केंद्र (Blood Test Center) तातडीने सुरू करण्यात यावे. सदर कार्यवाहीसाठी कायदे नियमांची अडचण येत असल्यास सदर कायद्यात दुरूस्ती करण्यात यावी. मात्र रुग्णांना असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
२) ग्रामिण रुग्णालयात मागणीनुसार औषधी प्राप्त होत नसल्यामुळे रुग्णांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. त्यामूळे सदर समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
३) वणी ग्रामिण रुग्णालय येथे लाखो रुपये खर्च करून ट्रामाकेअर युनिट चे बांधकाम करण्यात आले असून सदर बिल्डींग धूळखात पडलेली आहे. याकडे लक्ष देवून कार्यवाही व्हावी.
४) ग्रामिण रुग्णालय येथे डेंगू या जीवघेण्या आजाराची रक्त तपासणी होत नसल्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे. त्यामूळे वणी येथे स्थानिक पातळीवर डेंगू आजाराची रक्त तपासणी होण्याकरीता व्यवस्था करण्यात यावी. अशा विविध समस्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष हरीश पाते यांच्या नेतृत्वात देण्यात आले आहे.
वरील समस्या तत्काळ निकाली काढण्याकरीता आपले स्तरावरून आवश्यक कार्यवाही करावी अन्यथा नाईलाजास्तव वंचित बहुजन आघाडीला तीव्र आंदोलन छेडावे लागेल व यासाठी सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असा ईशाराही वंचित बहुजन आघाडी तालुका शाखेच्या वतीने देण्यात आला.
निवेदनावर तालुका अध्यक्ष हरीश पाते यांच्या सह अब्दुल गनी, किशोर मून, शारदा मेश्राम, प्रदीप मडावी, प्रणिता ठमके, शिवदास बामनकर, प्रशांत गाडगे, उत्तम मडावी, शंकर रामटेके, मारुती पेटकर, रेशमा भगत, बुद्धघोष लोणारे, देवानंद झाडे, नरेंद्र वाळके, तनुजा पथाडे, प्राची जावळेकर, ललिता तावडे, भारती पेंदोर, प्रशित तामगाडगे, उत्तम मडावी, पवन अलोणे, राकेश तावडे, प्रवीण वनकर, आदींच्या सह्या आहेत.