टॉप बातम्या

पांढरकवडा येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पांढरकवडा : दिनांक ११ जुन रोजी क्रांतिवीर शामादादा कोलाम परिवर्तनवादी कृती समिती जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने "विद्यार्थी गुणगौरव सोहळा" आयोजित करण्यात आला. सकाळी ११ वाजता या भव्य सोहळ्याचे उदघाटन स्थानिक नगर पंचायत पांढरकवडा येथे पडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. वामनराव ढोबळे सर, उदघाटक मा. श्री. रामदास टेकाड सर, प्रमुख पाहुणे मा.श्री. पैकुजी आत्राम सर, मा.श्री. हुसेन आजाम सर तर प्रमुख मार्गदर्शक मा. श्रीमती डॉ. लिला भेले या होत्या. कार्यक्रमाचे संचालन श्री. जयवंत टेकाम सर व श्री सुंदरलाल आत्राम सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रमेश आत्राम सर यांनी केले.

या कार्यक्रमास १० वी १२ वी च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी व पालक वर्गानी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविली होती, या कार्यक्रमांमध्ये मेटिखेडा येथील कु. गीतांजली सुरेश आत्राम हिने नीट परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावी बारावीच्या मुलामुलींना प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. पुढील वाटचालीसाठी मुलामुलींनी काय करावे या विषयी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. दिनकर कांडेकर यांनी केले.
Previous Post Next Post