सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वणी येथे वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
नेते आदित्य ठाकरे, यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर व सौ. किरण देरकर यांच्या नेतृत्वात शिवसेना व युवासेना तर्फे वणी शहराचे आराध्यदैवत श्री रंगनाथ स्वामी मंदिरात आरती पुजन, अभिषेक करून "शेतकरी सुखी तर देश सुखी" देशाचा पोशिंदा हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, त्यांच्यावर येणारे प्रत्येक संकट दूर करण्यासाठी आणि त्यांच्या शेतीमालासाठी भरभरून पाणी येऊ दे, यासाठी वरुन राज्याकडे साकडे घातले, तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भरभरून भाव मिळावा यासाठी श्री विष्णू देवाकडे प्रार्थना केली आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांना पुढील राजकीय सामाजिक क्षेत्रातील वाटचालीसाठी देवाकडे प्रार्थना करण्यात आली.
यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, सह संपर्क प्रमुख संतोष माहुरे, मा. उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास, जिल्हा समन्वयक समीर लेनगुरे, बंडूभाऊ निंदेकर, रवी ढूमने, नेताजी पारखी, विजय पानघंटीवार, प्रियांशु कडुकर, तेजस नागतूरे, रोशन काकडे, समीर मून, अजय लांजेवार, भगवान मोहिते, जगन जुनगरी, विनोद ढूमने, किशोर ठाकरे, चेतन उलमाले, यांच्यासह असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.