सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील घाटातून अवैधरित्या वाळू उपसा राजरोसपणे सुरूच आहे. वाळूची तस्करी वर आळा घालण्यासाठी महसूल प्रशासन कायम ऍक्शन मोडवर असताना, आता 13 फेब्रुवारी च्या रात्री पोलीस प्रशासनाने अवैध वाळूची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला आहे. त्यामुळे वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.
तालुक्यात मंगळवारी 13 फेब्रुवारी 2024 च्या मध्यरात्री 1 वाजता मारेगाव पोलीस पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे दापोरा ते चिंचमंडळ परिसरात एक व्यक्ती वाळू तस्करी करत असल्याची माहिती मिळाल्याने लगेच मारेगाव पोलिस चिंचमंडळ येथे रवाना झाले. त्यांना चिंचमंडळ ते दापोरा येथे वाळू ची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्र. (MH-30-AB-6686) चा नंबर असलेला,तर विना नंबर ची ट्रॉली असे, वाहन पोलीस प्रशासनाने पकडले असून ज्ञानेश्वर भगवान नारनवरे रा. खैरी (ता.राळेगाव) अशी जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर मालकाचे नाव असून सदर ट्रॅक्टर मारेगाव येथील पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मारेगाव येथील पोलीस विभागाचे ए.एस.आय प्रमोद जिड्डेवार, पो.हे.का रजनीकांत पाटील यांनी केली.