टॉप बातम्या

आजपासून कानडा येथे राष्ट्रसंताच्या पुण्यस्मरण सोहळ्याला सुरुवात...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : तालुक्यात शहर ग्रामीण भागात सध्या भक्तिमय वातावरण पहावयास मिळत आहे. अखिल विश्वाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आज कानडा येथे 55 वा पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला.

श्री गुरुदेव सेवा मंडळा, कानडा द्वारा आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याप्रसंगी भल्या पहाटे पासून जय्यत तयारी सुरु झाल्यागत प्रत्येक घरी रंगीबेरंगी रांगोळी ने अंगण सजावट दिसून आली असून घटस्थापना करण्यात आली. 

हा सोहळा 16 जाने. ते 17 जानेवारी पर्यंत असणार आहे. गावातील शेकडो महिला पुरुष आबाल वृद्ध, बालक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र आहे. आयोजित दोन दिवशीय कार्यक्रमात भजन व किर्तन, मिरवणूक वं महाप्रसाद अशा भक्तिमय वातावरणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 55 वा पुण्यस्मरण पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. 
Previous Post Next Post