टॉप बातम्या

मार्डी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शोभा कालर यांची निवड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मार्डी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुधाकर डाहुले यांचे निधन झाल्याने रिक्त असलेल्या पदाकरिता शनिवार दि. 13 जानेवारी ला घेण्यात आलेल्या निवडणुकीत सौ. शोभा विनोद कालर या विजयी झाल्या.
    
गेल्या 2022 मध्ये मार्डी ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणुकीत उपसरपंच पदी सुधाकर डाहुले यांची निवड झाली होती. परंतु ऑक्टोबर 2023 मध्ये सुधाकर डाहुले यांचे निधन झाल्याने मार्डी ग्रामपंचायतचे उपसरपंच पद रिक्त होते. तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी मारेगाव यांचे घोषित कार्यक्रमानुसार (ता.13) शनिवारला मार्डी ग्रामपंचायतच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत सौ. शोभा कालर यांनी सुरज दिवाकर पंडिले यांचा 5-4 मताच्या अंतराने पराभव केला. यावेळी अध्यासी अधिकारी सरपंच रविराज चंदनखेडे यांचे अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज निवडणूक निरीक्षक के.बी.यादव तसेच तलाठी ए.बी. पिंपरकर, ग्रामसेवक निलेश म्हसे यांनी कामकाज पहिले.
Previous Post Next Post