टॉप बातम्या

कानडा येथे सामूहिक चालीसा पठण व महाआरती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अयोध्या राम नगरी येथे प्रभू श्रीराम जन्मभुमी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याचे औचित्य साधत सोमवार दि.22 जानेवारी 2024 रोजी कानडा, येथे महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. खूप अनंदात व जोशात कार्यक्रम पार पडला. या वेळी सर्व नागरिकांनी प्रभू श्री रामचंद्रांचे घोषणांनी संपूर्ण परीसर गाजवला. सामूहिक हनुमान चालीसा ही महाआरती संपन्न झाली. या वेळी गावातील बाल गोपाळ,महिला पुरुष व सर्व नवयुवक मंडळी उपस्थित होते.
Previous Post Next Post