Page

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आज सोमवार दि.22/1/2024 ला आदर्श नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित वणी, एक वर्ष पूर्ण झाले असून त्या प्रित्यर्थ संस्थेच्या मुख्य कार्यालय येथे (घरसंसार सेल जवळ खराटे सरचे कॉम्प्लेक्स,वणी) प्रथम वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला.

या प्रसंगी मंचावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्निल गोहोकार संस्थेचे उपाध्यक्ष संदीप गोहोकार, ऑडिटर घागी साहेब व व्यवस्थापक प्रणाली दुर्गे मॅडम होत्या. सर्व उपस्थित समोर महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मल्याअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सोबतच संस्थेला विशेष योगदान दिल्या बद्दल अभिकर्ता, संदीप भाऊ आवारी व तुळशीराम भाऊ काकडे आणि कर्मचारी, तुषार देठे सर व दीपक भाऊ बोंडे याचा सत्कार करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्षांनी "संस्थेची वाटचाल यशस्वीरित्या चालू आहे व या वाटचालीमध्ये अभिकर्ता वर्ग कर्मचारी कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. ही पतसंस्था सर्वांच्या सहकार्याने समाजातील सर्वसामान्य घटकांसाठी कार्य करत आहे" असे मत संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्निल गोहोकार यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील गोहोकर उपाध्यक्ष संदीप गोहोकार व्यवस्थापक प्रणाली दुर्गे मॅडम ऑडिटर घागीं सर,संस्थेचे संचालक रवींद्रजी साळवे सर, साधना गोहोकार मॅडम, नितेश तुरानकार, आकाश मत्ते सर, शुभम गावंडे, स्वप्निल गोहोकार, रुपेश ठाकरे, सुजित गाताडे व संचालक मंडळ सभासद अभिकर्ता ठेवीदार व कर्मचारी वृंद उपस्थित होते.