सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
शेतकऱ्याच्या शेतमालाच्या चोरी संबंधाने गांभीर्य लक्षात घेवून, वणी येथे गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने गुन्हयाचा तपास करुन गुन्हेगारांचा शोध घेत असतांना गुन्हयाचे फिर्यादी विलास दत्तुजी देठळकर यांचे शेतातील
सालकडी अनिल चव्हाण रा. वांजरी यानेच शेतातील सोयाबीन चोरले असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याच्या आधारे वणी लागूनच असलेलं वांजरी गावात जावून फिर्यादी यांचे शेतातील अनिल नामदेव चव्हाण वय 50 वर्ष, रा.बेघर वांजरी यास ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला असता त्याने चार ते पाच दिवसांपूर्वी त्याचे गावातील जयश देऊळकर, रोशन देऊळकर, व अतुल ढवस यांचे मदतीने विलास दत्तुजी देऊळकर यांचे शेतातील बंडयामुधून अंदाजे 29 कट्टे सोयाबीन चोरले असल्याची व ते सोयाबीन त्याचे तिन साथीदारांनी मोटर सायकलवरुन नेऊन वणी येथे विकले असल्याची कबुली दिली. नमुद आरोपी अनिल नामदेव चव्हाण (50), रोशन तुळशीराम देउळकर (30), जयेश शंकर देऊळकर (20), अतुल उर्फ विवेक अवधुत ढवस (29), सर्व रा. बेघर वांजरी यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे सोयाबीन मालाबाबत विचारपूस केली. त्यांनी चोरी केलेले सोयाबिन वणी येथील विजय गुलाबराव निते (48), चंद्रशेखर पांडुरंग देठे (39), दोन्ही रा. चिखलगांव (ता.वणी) या वेगवेगळ्या दुकानदारांना विक्री केले असल्याचे दिसुन आले. नमूद दुकानदार यांचेकडुन अनुक्रमे 19 व 10 असे 29 कट्टे अंदाजे 15 क्विटल सोयाबीन किंमत 64,500 रु चे जप्त करुन आरोपीतांनी गुन्हयात वापरलेल्या 2 मोटर सायकल किमंत सत्तर हजार असा एकुण 1,34,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी अनिल चव्हाण रा. बेघर वांजरी व त्याचे साथीदार, रोशन देउळकर, जयेश देऊळकर, अतुल उर्फ विवेक ढवस, सर्व वांजरी यांना अटक करून पोलीस स्टेशन वणी यांचे ताब्यात देण्यात आले. त्या शेतकऱ्याचा शेतमाल चोरणारा चक्क सालगडीच निघाल्याने आता शेतकऱ्याने विश्वास तरी कुणावर ठेवावा? हाच प्रश्न निर्माण झाला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा, यवतमाळ, पांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, योगेश डगवार, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, चापोहवा नरेश राउत यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.