टॉप बातम्या

भारतीय जनता पार्टीत नवरगाव येथील शेकडो ग्रामस्थांचा पक्षप्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज 13 जानेवारी 2024 रोजी मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण) येथील शेकडो ग्रामस्थांनी वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या विकासात्मक कामाला प्रेरीत व नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला.

यामध्ये उपसरपंच संतोष महाडुळे तर सदस्य शशिकांत डवरे यांच्या सह महिलां तसेच पुरुषांचा अधिक प्रमाणात समावेश होता. तालुक्यातील जनमानसात स्वच्छ प्रतिमा असणारे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट अशी मारेगाव तालुक्यात लांबट यांची ओळख आहे. ते अध्यक्ष पदी विराजमान होताच प्रथमच मारेगाव तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये पक्ष प्रवेशाला सुरुवात झाली आहे.

या प्रसंगी बोलताना श्री. बोदकुरवार यांनी त्यांच्या स्थानिक आमदार निधीतून 9 लक्ष रुपयाचा काँक्रेट रोड नवरगांव येथील वार्ड क्रमांक 1 मध्ये मंजूर करून दिलेला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यापुढे आपण आपल्या सहकार्याने बरेच विकासकाम राबवू असेही ते म्हणाले. यावेळी सर्वांचे स्वागत करून सर्वाना शुभेच्छा दिल्या.
          
यावेळी माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शालिनीताई दांरुडे, मारोती तुराणकर, उपसरपंच संतोष महाडुळे, ग्राम. सदस्य शशिकांत डवरे शेषराव उपरे, अफजल खां पठाण, हर्षल शेंडे, राखीताई करलुके, गुलशन पठाण व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post