Top News

स्वर्गीय सुधाकर कोसारकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ अपंग शाळेला भेट वस्तू


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : दि.१५ डिसेंबर २०२३ ला महेश कोसारकर यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वर्गवासी श्री.सुधारक कोसारकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज वणी येथील अपंग शाळेला भेट स्वरूपात टी-शर्ट व खाण्याचे अल्पोहार देण्यात आला.
महेश कोसारकर यांचा जन्मदीनाचे औचित्य साधून त्यांनी अपंग शाळेला भेट वस्तू दिल्या, यावेळी त्यांच्या आई रुपलता सुधाकर कोसारकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसह आपल्या चिरंजीव याचा अभिष्टचिंतन सोहळा सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला, तेव्हा शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.
या प्रसंगी रूपलता सुधाकर कोसारकर व महेश सुधाकर कोसारकर, यांचे आभार मानले व महेश कोसारकर यांना निरोगी दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Previous Post Next Post