टॉप बातम्या

ग्रामीण रुग्णालयात आयुष्यमान भवचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न


सह्याद्री चौफेर | अनंता पाचपोहर

मारेगाव : शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे बुधवार 13 सप्टेंबर रोजी आयुष्यमान भव कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्सहात करण्यात आले. या प्रसंगी नायब तहसीलदार मडकाम मॅडम (मारेगाव तहसील कार्यालय) यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेला हार अर्पण करुण अभिवादन केले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.मडकाम मॅडम (नायब तहसीलदार मारेगाव), डॉ मस्की (नगराध्यक्ष) व सर्व मान्यवर पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.वैद्यकीय अधीक्षक डॉ.इंगळे सर, इन्चार्ज सिस्टर श्रीमती.कोवे मॅडम, आदी सह सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा महत्वकांक्षी निर्णय घेण्यात आला. सर्व नागरिकांना मिळणार आहे.  आयुष्मान भवः या महत्वकांक्षी योजनेअंतर्गत मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. लवकर निदान,मोफत उपचार, निरोगी ठेवा आपला परिसर यासह आयुष्यमान आपल्या दारी 3.0, आयुष्यमान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांतील मुलांची तपासणी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ही मोहीम 1 सप्टेंबर ते 2 ऑकटोबर या दरम्यान राबविण्यात येत आहे. याचा लाभ तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी देठे मॅडम यांनी केले आहे. 


Previous Post Next Post