टॉप बातम्या

नायसाने चक्क आपल्या नंदीवरून लाँच केले चंद्रयान-3


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सर्वत्र तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. तालुक्यात विविध ठिकाणी तान्ह्या पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

लहान मुलांनी विविध वेशभूषा करत तान्हा पोळ्याला हजेरी लावली. यात टाकळी (कुंभा) तान्हा पोळ्यात नायसा नवनीत जवादे या नर्सरी मध्ये शिकणाऱ्या चिमुकलीने चक्क आपल्या नंदी वरून चंद्रयान-3 लाँच करत एक उत्तम असा वैज्ञानिक संदेश दिला. यामुळे सर्वत्र हा विषय कौतुकास्पद ठरला.
Previous Post Next Post