अक्षय कुमारला अखेर मिळालं भारताचं नागरिकत्व, पोस्टवर कौतूकाचा वर्षाव..

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. आज त्यानं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं एक खास पोस्ट शेयर केली आहे. 

अक्षयनं आता इंस्टावरुन खास पोस्ट शेयर करत आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. 

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा सध्या लाईमलाईट आहे. एकीकडे त्याचा "ओएमजी २" नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दुसरीकडे आता त्याला भारताचे नागरिकत्वही मिळाले आहे. 

अनेक माध्यमांनी अक्षयला त्याच्या नागरिकत्वावरुन टीका केली होती. त्याला लक्ष्य केले होते. सोशल मीडियावर तो नेहमीच ट्रोलही होत असे. यापूर्वी अक्षयकडे कॅनडा देशाचे नागरिकत्व होते. 


Previous Post Next Post