सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
रमेश दादू भाटी (अंदाजे वय 75) रा. टाकरखेडा असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. ते अंगणातील बकुळीच्या झाडाला दोरा बांधून गळाफास घेतलेले सकाळी आढळून आले. रमेश याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याच्या पाठीमागे पत्नी, दोन मुल, तीन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे. सदर घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
वृत्त लिहेपर्यंत संबंधित प्रशासन घटनास्थळी दाखल व्हायचे होते अशी माहिती आहे.