सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : सध्या डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात आहे. याचा त्रास लोकांना खूप सहन करावा लागत आहे, त्यात राजुर येथे खूप रुग्णांची संख्या असल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) द्वारे भव्य डोळ्याचा साथ निवारण शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे मुख्य अतिथी शिवसेना नेते तथा उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संजयभाऊ देरकर हे होते. तसेच सहसंपर्क प्रमुख संतोषभाऊ माहूरे, विजय पानघंटीवार सदस्य खरेदी विक्री संघ, झरी, बालाजी मिलमीले, मो. अस्लमभाई, भगवान मोहिते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या शिबिराला नेत्ररोगतज्ञ डाॅ. स्वप्निल गोहोकर यांनी रूग्ण तपासून उपचार केले. शिबिराला अमृत फुलझेले युवासेना शहर प्रमुख, अभिजीत सुरशे उपशहर प्रमुख, प्रणीता असलम शेख माजी सरपंच, दिशा फुलझेले ग्रा. प.सदस्य, प्रेमा धानोरकर माजी सरपंच भांदेवाडा, सतीश तेवर, सय्यद मोसीम, अनुराग सिंग, अमित सिंग, जय चौहान, सुशिल आडकीने इत्यादीचे कार्यक्रमास सहकार्य लाभले.
विशेष परिश्रम फैजल बशीर खान संचालक वणी नागरी सहकारी बँक लिमिटेड वणी यांनी घेतले. शिबिराला शिवसेना (उबाठा), संजयभाऊ देरकर मित्र परिवार आणि राजूर शहर परिसरातील नेत्र गरजू रुग्णांनी लाभ घेतला.