सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : वणी-मारेगाव महामार्गांवरील वेगांव फाट्यावर एका दुचाकीला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
तालुक्यातील मांगरूळ वेगाव फाट्या जवळ चारचाकी वाहण आणि दुचाकीचा आज गुरूवार (ता.20) दुपारी 12 वाजताच्या दरम्यान, अपघात घडला. यात दुचाकीस्वार गंभीरीत्या जखमी झाला आहे.
तालुक्यातील कोलगाव येथून गावाकडे परतांना वणी-मारेगाव राज्य महामार्गांवरील मंगरूळ गावालगत वेगांव फाट्यावर भरधाव कार क्र. (एम एच 49 बि 2416) ने मागून दुचाकी क्र (एम एच 34 एक्स 6371) ला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार प्रमोद नानाजी पाचभाई रा.कुचना (ता. वणी) गंभीर जखमी झाला. तर सोबत असलेली किरकोळ जखमी आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
पुढील तपास पोलीस करित आहे.