टॉप बातम्या

गोंडबुरांडा येथील नवविवाहित महिलेने घेतला गळफास

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : नवविवाहीत महिलेने स्वगृही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवार ला सायंकाळी सहा वाजता घडली. या दुर्देवी घटनेने गोंडबुरांडा येथे शोककळा पसरली आहे.

रीना सुनील मुसळे (21) रा. गोंडबुरांडा असे गळाफास घेतलेल्या  युवा महिलेचे नाव आहे. रीना हिचा सहा महिन्यापूर्वी गावातच सुनील नामक युवकाशी प्रेमविवाह केला होता असे समजते.

आज शनिवारी रोजी सासरी असतांना विवाहितेने घरातच गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. त्या नंतर काही वेळाने कुटुंबातील काही व्यक्ती शेतातून घरी परंतल्या नंतर रीना घरामध्ये गळफास लावून असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करुन शव उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वृत्त लिहेपर्यंत रीना हिच्या आत्महत्येचे नेमकं कारण कळू शकले नाही. मात्र, या विवाहित महिलेच्या टोकाच्या निर्णयाने गावात पुरती शोककळा पसरली आहे.

पुढील तपास ठाणेदार राजेश पूरी यांचा मार्गर्शनाखाली मारेगाव पोलीस करत आहे.
Previous Post Next Post