Page

एस.पी.एम विद्यालय येथील बाल संस्कार शिबिराचा समारोप

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : एस. पी एम विद्यालय येथील दि.26 एप्रिल ते दि 3 मे 2023 पर्यंत आयोजित केलेल्या बालसंस्कार शिबिराचा आज समारोप करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मुख्याध्यापकांनी व उपमुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना शिबिराचे महत्त्व सांगून बालकाचा शारीरिक बौद्धिक व मानसिक विकास कसा होतो तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात शिबिरातून शिकलेल्या गोष्टीचे व मूल्यांचा कशाप्रकारे अंगीकार करावा हे पटवून सांगितले यानंतर विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या शिबिराबद्दलचे अनुभव सांगितले, यानंतर सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अल्पोपहार देण्यात आला व शिबिराची सांगता करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बुजोने सर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.