Page

तहसील कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज दि 11 एप्रिल 2023 ला मारेगाव तहसील कार्यालय येथे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त कार्यालयाच्या वतीने महान समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तहसील कार्यालयाच्या वतीने महात्मा फुले यांच्या प्रतिमेला तहसीलदार श्री दिपक पुंडे साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी नायबतहसीलदार श्री अरुण भगत साहेब, निवडणूक नायब तहसीलदार श्री यादव साहेब, पुरवठा निरीक्षक श्री रमेश वाढवे, प्रवीण घोडे ढेंगळे बाबू, उपस्थित होते. तहसील कार्यालयाच्या वतीने महान समाजसुधारक महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी प्रीतम राजगडकर, सचिन पेंदाणे, विजय कनाके, पोतराजे, विकास मडावी, के एस वेले, देवगडकर, पि एम निमसटकर, लताताई मेश्राम, प्रभा आरके, शाहरुख आदीं सह कर्मचारी उपस्थित होते.