टॉप बातम्या

दुःखद बातमी...तलाठी नविन पारख सुरपाम यांचे आज पहाटे निधन



सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पांढरकवडा : सेवानिवृत्त नायब तहसीलदार पारख सुरपाम यांचे सुपुत्र नविन सुरपाम (तलाठी) यांचे अल्पशा आजाराने आज सोमवार ला पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय (४३) होते. त्यांचे निधनाने झरी-मारेगाव-पांढरकवडा मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.

मारेगाव तालुक्यातील सुभाष नगर येथे सुरपाम कुटुंब वास्तव्यात होते. वडील पारख सुरपाम हे मारेगाव येथे नायब तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झाले होते. मुलगा नविन याचे शिक्षणही मारेगाव येथे झाले. 
   
कालांतराने नवीनला जिल्हा मध्यवर्ती बँकेत नौकरी प्राप्त झाली. ही नौकरी सोडून तो तलाठी पदावर झरी (जामनी) येथे कार्यरत होता. तूर्तास पांढरकवडा येथे वास्तव्यात असतांना मागील काही दिवसांपासून प्रकृती साथ देत नव्हती. दोन दिवसांपूर्वी नविन सुरपाम यास उमरी दवाखान्यात भरती करण्यात आले. आज सोमवार दि.20 मार्च 2023 ला पहाटे त्याची प्राणज्योत मालवली आणि सुरपाम कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले.
     
नविन याच्या पाठीमागे आई, पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहेत. आज दुपारी एक वाजता पांढरकवडा स्थित त्याचेवर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी त्यांचे निकटवर्तीयांनी सांगितले. 
Previous Post Next Post