Page

श्री दिलीप गोहोकार यांचे दीर्घ आजाराने निधन

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : एस. पी एम विद्यालयातील कार्यरत शिक्षक श्री दिलीप गोहोकार यांचे काल दीर्घआजाराने नागपूर येथे निधन झाले. त्यांचे मृत्यू समयी वय 50 वर्ष होते. ते गणित विषयाचे शिक्षक होते.

गेल्या अनेक दिवसापासून ते आजारी होते, अखेर काल दि.23 जाने. ला दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे  वणी मोक्षधाम येथे 3.30 वा. पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. अशी माहिती त्यांचे निकटवर्तीयांनी दिली.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.