टॉप बातम्या

महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यावरुन वंचितकडून चंद्रकांत पाटील यांचा निषेध

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निषेध करण्यात आला. सोमवारी (दि.१२) दुपारी मारेगाव येथील तहसीलदार दिपक पुंडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तसेच ठाणेदार पुरी यांचे मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
वंचित चे तालुकाध्यक्ष गौतम दारुण्डे व संजय जिवणे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांचा निषेध व्यक्त केला. भाजप नेते सतत महापुरुषांचा अवमान करून समाजाबांधवांच्या भावना दुखावत आहेत. पाटील यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावे. त्यांचे वर शाई फेकल्या नंतर १० कलमाहून गुन्हे दाखल केले. देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलावर देशद्रोहा चा गुन्हा दाखल करावे आणि तात्काळ अशा बेजबाबदार व्यक्तीला पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. किंबहुना अधिकार देवू नये. 
     (मारेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देतांना वंचित'चे पदाधिकारी)

मतांची भीक मागणाऱ्यांना काय बोलावं - संजय जीवणे उपाध्यक्ष 

अलीकडे काही जणांच्या मेंदू आणि जिभेच्यामध्ये असणाऱ्या तारा तुटल्या असाव्यात, असे त्यांची वक्तव्ये ऐकून वाटते. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावावर मतांची भीक मागणारे त्यांचा तुच्छ भाषेत सतत अपमान करत असल्याचे पाहून वाईट वाटते. याचे उत्तर त्यांना हा स्वाभिमानी महाराष्ट्र दिल्याशिवाय राहणार नाही.
शिव, शाहू, फुले, आंबेडकर जर नसते तर आजचा महाराष्ट्र घडलाच नसता. भाजपाच्या लोकांमध्ये महापुरुषांच्या बाबत बदनामीकारक वक्तव्य करण्याची स्पर्धाच लागली आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात, अशी प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष गौतम पांडुरंग दारुण्डे यांनी मंत्री चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याचा आम्ही सर्व निषेध करतो.
यावेळी निवेदन देताना तालुकाध्यक्ष गौतम दारुण्डे, उपाध्यक्ष संजय जीवणे, रमेश चिकाटे, मोरेश्वर खैरे, वसूमित्र वनकर, भगवान इंगळे, विशाल ताकसांडे, अनंता खाडे, राजू पाटील, लक्ष्मीकांत तेलंग, रविंद्र तेलंग, गौतम बखेडे, प्रकाश काळे, आत्माराम भेले, अजय चंदनखेडे, बंडू पाटील, प्रमोद गाणार, संजय येरमे, रवी वनकर, रेणुदास काळे, दिलीप पाटील, सुधाकर भगत यासह असंख्य पदाधिकारी वर कार्यकर्ते उपस्थित होते. 

Previous Post Next Post