सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके
नागभिड : बौद्ध समाज जनकापूर यांचे विद्यमाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम आज सकाळी संपन्न झाला.या निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णकॄती पुतळ्याला बौद्ध समाज सचिव पंकज रामटेके यांनी पुष्पहार अर्पण केला.तर ध्वजारोहण अध्यक्ष रामदास सुर्यवंशी यांनी केले. तसेच बौद्ध उपासक अरविंद चदंनखेडे, ब्रम्हदास शेंडे, राहुल रामटेके प्रितम खोब्रागडे,भगवान गोढांणे, संगिता रामटेके, सरिता रामटेके, एकनाथ खोब्रागडे, वसंता मेश्राम, बाबुराव खोब्रागडे, नितेश गणवीर, उमेश मेश्राम, सुरज खोब्रागडे, आदी उपासकांनी बाबासाहेब यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे संचालन महेश रामटेके यांनी केले. यावेळीही बौद्ध उपासक महिला व पुरुष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.