सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
7218187198
मारेगाव : तालुक्यातील बोटोणी वन परीक्षेत्रातील या बीट अंतर्गत येत असलेल्या खेकडवाई जंगलालगत शेतशिवारात दावणीला बांधून असलेल्या पशुधनावर वाघाने हल्ला करून ठार केले तर, दुसऱ्या गोऱ्याला गंभीर जखमी केल्याची घटना दि.13 नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली.
तालुक्यातील खेकडवाईला लागुन जंगल आहे. येथील शेत शिवारात दावणीला बांधून असलेल्या किसन चंदू आत्रम रा. खेकडवाई, यांच्या पशुधनावर वाघाने हल्ला करून ठार केले, तर दादाजी रामपुरे रा. खेकडवाई, याच्याही गोऱ्यावर हल्ला चढवला असता किसन चंदू आत्रम यांच्या पत्नीला दिसताच आरडाओरडा केल्याने वाघ तेथुन पसार झाला. परंतू चंदू आत्राम यांचे गोरं ठार झाले असून रामपुरे यांचे गोरं गंभीर जखमी केले असून येथील पोलिस पाटील रामपुरे यांनी वन विभागाला संपर्क साधून घटनेचा महिती दिली. मारेगाव येथिल वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर सह वनविभागाची पुर्ण टीम घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून या शिवारात वाघाच्या खुणा दिसून आल्याने वाघ असल्याचे निष्पन्न झाले असून वन विभागातर्फे लोकांना "शेतात काम करीत असतांना सतर्कता बाळगा, एकटे शेतात जाऊ नका, शेतात जात असतांना आवाज करत जा, ग्रुप ने राहा" असे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांनी गावातील लोकांना सुचना दिली.
मात्र, या घटनेने परीसरात दहशत पसरली असून, शेतऱ्यांच्या शेतात पिके असल्यामुळे शेतात जावंच लागत, तसेच मजूरी करणाऱ्या मजुरामध्ये सुद्धा भितीचे वातावरण निर्माण झाल्याने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.