वणी शहरातील कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे याची विल्हेवाट लावा- राष्ट्रवादी युवक पक्षाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : वणी शहरातील प्रभागात,शाळेच्या आवारात ठिकठिकाणी कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विविध ठिकाणी दुर्गंधी पसरली असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱ्याची व घाणीची तात्काळ विल्हेवाट लावण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मंगळवारी मुख्याधिकारी अभिजित वायकोस  यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, वणी शहरातील प्रभागात व सार्वजनिक ठिकाणी कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शाळा, महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, महापुरुषांच्या पुतळ्या जवळ कचऱ्याचे ढीग पडले आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. परिणामी कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावण्यात यावी, जर आपण कचऱ्याचे व्यवस्थापन केले नाही तर, याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनामध्ये होईल. त्यामुळे स्वच्छता अभियान राबवून वणीकरांच्या आरोग्याचा विचार करावा. असे निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष मनोज वाकटी यांच्या नेतृत्वात जिल्हा सरचिटणीस विजय नगराळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजू डावे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष रामकृष्ण वैद्य, ओबीसी सेल अध्यक्ष गुणवंत टोंगे, युवक तालुका अध्यक्ष हेमंत गावंडे, युवक तालुका उपाध्यक्ष मोबिन शेख, युवक विद्यार्थी शहर अध्यक्ष संदेश तिखट, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post